Walmik Karad Surrender: मोठी बातमी! अखेर वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण
बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबरला हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. जातीयवादातून ही हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जात होता. यादरम्यान राजकीयवर्तुळात खळबळ माजली होती. बीड प्रकरणाचा मुख्य आरोपी म्हणून ज्याच्याकडे बोट उचल्ली जात आहेत त्या वाल्मिक कराड याला अटक करावी यासाठी अनेक मोर्चे काढले जात होते. तो वाल्मिक कराड अखेर आज पुणे पोलिसांना शरण आला आहे. यापुर्वी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते संवाद साधत काय म्हणाले जाणून घ्या.
राजकीय द्वेषापोटी माझं नाव त्यांच्यासोबत जोडलं- वाल्मिक कराड
मी वाल्मिक कराड, केज पोलीस स्टेशनला कोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी करावी... राजकीय द्वेषापोटी माझं नाव त्यांच्यासोबत जोडलं जात आहे. पोलिस तपासांचे निष्कर्ष मी जर दोषी दिसलो तर न्याय देवता मला जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे....
कोण आहेत वाल्मिक कराड?
बीड तालुक्यामध्ये वाल्मिक कराड हे वाल्मिक अण्णा म्हणून ओळखले जातात. मात्र, वाल्मिक कराड यांचा वाल्मिक अण्णापर्यंतचा प्रवास महत्त्वाचा आहे. 'त्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पानदेखील हालत नसल्याचं विधान स्वत: पंकजा मुंडे यांनी एका भाषणात केले होते. भाजप आमदार सुरेश धस यांनीही कराड यांच्याविषयी वक्तव्य केलं आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी घरकामासाठी ठेवलेला मुलगा अशी कराडांची ओळख होती. वाल्मिक कराड हे गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करत असल्याचं म्हटलं जातं.
धनंजय मुंडेंसोबत वाल्मिक कराड यांचा काय संबंध
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे दोघे चांगले मित्र होते, जेव्हा धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेपासून दूर झाले तेव्हा वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेसोबत आले. त्यानंतर धनंजय मुंडे यांचे सर्व आर्थिक व्यवहार आणि मोठे कार्यक्रम घेण्याची जबाबदारी वाल्मिक कराड पार पाडत असल्याचं म्हटलं जात आहे. धनंजय मुंडे राजकारणात आले तेव्हापासून वाल्मिक कराड सावलीसारखे त्यांच्यासोबत आहेत. जणू धनंजय मुंडे पालकमंत्री असताना ते एक प्रकारे जिल्हा चालवायचे. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना कराड याचा दरारा असल्याचं म्हटलं जात आहे. कराड याचे अनेक नेत्यांसोबत फोटो आहेत.