'वंदेभारत एक्सप्रेस'ची लॉटरी पुणेकरांनाही; दोन एक्सप्रेस पुणे रेल्वे स्टेशन वरून धावणार

'वंदेभारत एक्सप्रेस'ची लॉटरी पुणेकरांनाही; दोन एक्सप्रेस पुणे रेल्वे स्टेशन वरून धावणार

बहुचर्चित वंदेभारत एक्सप्रेस चा लाभ आता पुणेकरांनाही मिळणार आहे.

अमोल धर्माधिकारी, पुणे

बहुचर्चित वंदेभारत एक्सप्रेसचा लाभ आता पुणेकरांनाही मिळणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या दोन ट्रेन पुणे रेल्वे स्टेशन मार्गे धावणार आहेत. यातील एका सोलापूर ते मुंबई वंदेभारत एक्सप्रेसची लोकार्पण येत्या 10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सोलापूर ते मुंबई आणि पुणे सिकंदराबाद या दोन वंदेभारत एक्सप्रेस पुणे रेल्वे स्थानकातून धावणार आहे. येत्या 10 फेब्रुवारीला यातील सोलापुर ते मुंबई या एक्सप्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर साईनगर ते शिर्डी या वंदे भारत एक्सप्रेसचे ही उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

10 फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणारी वंदे भारत एक्सप्रेस सोलापूर स्थानकावरून दुपारी तीन वाजता मुंबईच्या दिशेने धावेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून या दोन्ही रेल्वेगाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवतील. मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदेभारत एक्सप्रेस ताशी 110 किलोमीटर वेगाने धावेल. ही रेल्वे पुण्यातून जाणार असल्याने पुणेकरांना प्रथमच वंदे भारत एक्सप्रेस चा प्रवास अनुभवता येणार आहे.

सोलापूरहून सकाळी 6 वाजून पाच मिनिटांनी सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस सकाळी नऊ वाजता पुण्यात दाखल होईल. त्यानंतर दुपारी बारा वाजून 30 मिनिटांनी ती मुंबईला पोहोचेल. त्याच दिवशी दुपारी चार वाजून दहा मिनिटांनी ती मुंबईहून सुटेल. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ती पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचेल. रात्री दहा वाजून 40 मिनिटांनी ती सोलापूरला पोहोचेल. आठवड्यातून सहा दिवस ही सेवा असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com