वर्धा : पट्टेदार वाघाची शिकार की आकस्मिक मृत्यू? वनविभागात खळबळ

वर्धा : पट्टेदार वाघाची शिकार की आकस्मिक मृत्यू? वनविभागात खळबळ

वाघाच्या अवयवाचे अवशेष आढळले नाल्यात
Published by :
Sudhir Kakde

वर्धा | भूपेश बारंगे : आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या समुद्रपूर तालुक्यातील करूळ पवनगाव शेत शिवारात आज सायंकाळच्या सुमारास गुराख्याना पट्टेदार वाघाच्या अवयवाचे अवशेष वेगवेगळ्या ठिकाणी आढळली.या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असता वनविभागात खळबळ उडाली आहे. समुद्रपूर तालुक्यातील पवनगाव शिवारात गुराखी पाणवठया लगत जनावरे चारत असताना दुर्गंधी येत असल्याने पाहणी केली असता वेगवेगळ्या ठिकाणी वाघाच्या अवयवाचे तुकडे आढळले. काही अवयव पाण्यात तर काही अवयव पडीक जागेत दिसून आले.वाघाच्या अवयवाचे अवशेष आढळल्याने वाघाची एवढे तुकडे कसे झाले याबाबत आता शंका व्यक्त होत आहे. वाघाच्या अवयवाचे अवशेष वेगवेगळे आढळल्याने तस्करी करण्यात तर आली नाही ना असा संशय व्यक्त होत आहे.

वाघाची शिकार की आकस्मिक मृत्यू यावरही शंका व्यक्त केली जात असून अनेक चर्चेला उधाण आले आहे. वाघाच्या मृत्यूने वनविभागात खळबळ उडाली असून घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी पोहचले असता पंचनामा करण्यात आला. सायंकाळी उशिर झाल्याने पशुवैद्यकीय अधिकारी पोहचू शकले नाही .सूर्यास्त नंतर शवविच्छेदन करण्यात येत नसल्याने शवविच्छेदन केले नाही. वाघाचा मृत्यूचे कारण अद्यापही गुलदस्त्यात असले तरी शवविच्छेदन केल्यानंतर माहिती पडू शकते.वाघाच्या मृत्यू कशाने झाला त्याचे अवयवाची चोरी तर झाली नाही ना अशी यावेळी चर्चा सुरू असल्याचे समजते.या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता वन्यप्रेमी करत आहे.

घटनास्थळी पाहणी नंतर कळणार

आज वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती आमच्या पर्यंत पोहचली असून सूर्यास्त झाल्याने त्यावर शवविच्छेदन करण्यात आले नाही उद्या सकाळी आम्ही त्याठिकाणी पोहचून पाहणी करणार आहे.शिकार आहे की आकस्मिक मृत्यू आहे हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर कळेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com