आदित्य ठाकरेंना पप्पू म्हणणं हे दुर्दैवच - वरुण सरदेसाई

आदित्य ठाकरेंना पप्पू म्हणणं हे दुर्दैवच - वरुण सरदेसाई

उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे अमरावती दौऱ्यावर आहे.

सूरज दहाट, अमरावती

उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे अमरावती दौऱ्यावर आहे, आदित्य ठाकरे यांना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पप्पू म्हणून टीका केल्या नंतर यावर वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आदित्य ठाकरे यांना पप्पू म्हणणं हे फार दुर्दैवी आहे,

ओला दुष्काळ असताना सरकार मदत करत नाही तर वैयक्तिक टीका टिपणी करणे हे महाराष्ट्रच्या संस्कृतीला धरून नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली,तर बच्चू कडू व रवी राणा वादावर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली, बच्चू कडू हे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या मना मध्ये काय आहे हे बोलले आहे म्हणून त्यांच अभिनंदन केलं पाहिजे असा टोला त्यांनी लगावला.

आदित्य ठाकरेंना पप्पू म्हणणं हे दुर्दैवच - वरुण सरदेसाई
शिंदे-फडणवीस सरकारचा मविआला दणका; विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत बदल
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com