अखेर ठरलं! वसंत मोरेंना वंचितकडून उमेदवारी जाहीर, पुण्यात होणार तिहेरी लढत

अखेर ठरलं! वसंत मोरेंना वंचितकडून उमेदवारी जाहीर, पुण्यात होणार तिहेरी लढत

वंसत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Published by :
shweta walge
Published on

राज्यात लोकसभा निवडणुकीत यावेळी अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. यातच वंसत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वंसत मोरे गुरुवारी ( 4 एप्रिल ) वंचित बहुजन आघाडीत अधिकृतपणे पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

पुणे लोकसभेची रणधुमाळी आता सुरु झाली आहे. आज मंगळवारी (ता. 02 एप्रिल) वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर करण्यात आली असून या यादीमध्ये वसंत मोरे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच वंसत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वंसत मोरे गुरुवारी ( 4 एप्रिल ) वंचित बहुजन आघाडीत अधिकृतपणे पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com