संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर वसंत मोरे यांची प्रतिक्रिया म्हणाले...

संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर वसंत मोरे यांची प्रतिक्रिया म्हणाले...

वसंत मोरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar

वसंत मोरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. वसंत मोरे यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वसंत मोरे म्हणाले की, मला लोकसभेला संधी मिळेल असं वाटते आहे. मविआच्या सगळ्या नेत्यांना भेटलो. मी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटी घेत आहे.

पुणेकरांच्या हिताची निवडणूक करायची आहे. मी कुणालाही लपून भेटत नाही, सर्वासमोर भेटतोय. सर्व नेत्यांशी सकारात्मक चर्चा झाली. मविआच्या नेत्यांकडून मला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. सगळ्यांचे म्हणणं आहे की पुण्यामाध्ये वॉशिंग मशीन नको तर मीसुद्धा त्याच मताचा आहे. पुण्यात कोणत्याही परिस्थितीत वॉशिंग मशीन नसायला पाहिजे.

पुण्याला गेल्यावर रविंद्र धंगेकरांना भेटणार. माझा विषय धंगेकरांना सांगणार. मी लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम. मी ज्या विषयासाठी पक्ष सोडला आहे त्या विषयावरती मी आता काम करतो आहे. पुण्यातील नागरिकांसाठी मला पुणे लोकसभा लढायची आहे. वसंत मोरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com