प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर वसंत मोरे म्हणाले...

प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर वसंत मोरे म्हणाले...

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आज वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

वसंत मोरे म्हणाले की, मी पुणे लोकसभेची निवडणूक लढणार हे 100 टक्के आहे. मी माझे नशिब समजतो की मला वंचित बहुजन आघाडीचे सर्वासर्वे आंबेडकर साहेब यांनी बोलवले आणि मला एवढा वेळ त्यांनी दिला. या वेळेमधून चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे. येणाऱ्या 1 - 2 दिवसांमध्ये ज्या स्तरावरती चर्चा व्हायच्या आहेत मोठ्या आज माझा पहिलाच दिवस आहे. पहिल्यांदाच चर्चेला आलो आहे.

अजून पुणे लोकसभेची निवडणूक ही चौथ्या टप्प्यामध्ये आहे. ती खूप लांब आहे. त्यामुळे मला वाटतं की जी चर्चा आमच्यात झाली आहे ती सकारात्मक झालेली आहे. त्याच्यामध्ये जे काही पुढचं मार्ग असतील ते येणाऱ्या 2 - 4 दिवसांमध्ये सगळं कळेल. सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि त्याचे फलित हे पुणे लोकसभेचा खासदार हा या सगळ्या विचारातून होईल याची मला पूर्ण खात्री आहे. येणाऱ्या 2 - 3 दिवसांत याबाबत निर्णय होईल. असे वसंत मोरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com