Vasant More  : वसंत मोरे 5 एप्रिलला वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार

Vasant More : वसंत मोरे 5 एप्रिलला वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार

वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर करण्यात आली असून या यादीमध्ये वसंत मोरे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.

आता वसंत मोरे 5 एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडी पक्षात अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत वसंत मोरे यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

अकोल्यातील प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी हा प्रवेश होणार आहे. शक्ती प्रदर्शन करत वसंत मोरे यांचा पक्ष प्रवेश सोहळा अकोल्यात पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com