वसंत मोरे आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार; कारण काय?

वसंत मोरे आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार; कारण काय?

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता वसंत मोरे आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत. वसंत मोरे मुंबईत प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

पुण्यात अपक्ष म्हणून लढण्याची तयारी वसंत मोरे यांनी सुरु केली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा पाठींबा मिळावा यासाठी भेट घेणार असल्याचे बोललं जात आहे.

यावर वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वसंत मोरे म्हणाले की, मागच्या आठवड्यामध्ये माझा साहेबांबरोबर संपर्क झाला होता. त्यांच्याबरोबर पुणे शहराची एकूण संपूर्ण परिस्थिती, पुणे शहराची निवडणूक कशा पद्धतीने जाऊ शकते. याच्यामध्ये एक चांगले आव्हान कशा पद्धतीने उभे करुन आता लढायचे ते जिंकण्यासाठीच. त्यामुळे मी आज बाळासाहेबांना भेटण्यासाठी निघालो आहे.

सविस्तर चर्चा झाल्यानंतर मी बोलेन की, कशा पद्धतीने काय होणार पुण्यामध्ये. माझ्या हेतू जो आहे की पुण्यामध्ये ही निवडणूक काही लोकांनी प्रतिष्ठेची केली आहे. तर ती निवडणूक मला पुणेकरांसाठी लढायची आहे. पुण्याच्या प्रश्नांसाठी लढायची आहे. त्यामुळे अपक्ष मी या ठिकाणी उभा आहे. मी माझा प्रस्ताव साहेंबासमोर ठेवणार. साहेब मोठे नेते आहेत. ते योग्य तो निर्णय घेतील. असे वसंत मोरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com