मोठी बातमी : एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात  मध्यरात्री अडीच तास गुप्त बैठक

मोठी बातमी : एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात मध्यरात्री अडीच तास गुप्त बैठक

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत युतीसाठीच्या चर्चा रंगल्या आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत युतीसाठीच्या चर्चा रंगल्या आहेत. यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात काल मध्यरात्री गुप्त बैठक झाली. तब्बल अडीच तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

महापालिका निवडणुका आणि विधान परिषदेत बहुजन समाजाची मते मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळेच शिवसेनेनेही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतला. ख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची काल रात्री वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली. चर्चेवेळी शिंदे आणि आंबेडकरच होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शरद पवार यांनीही ठाकरे वंचित यांच्या युतीला हिरवा कंदील दाखवला होता. मात्र, आता शिंदे-आंबेडकर यांच्या भेटीने या युतीत नवीन काही घडणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com