रितेश देशमुखच्या ‘वेड' गाण्याची कोकणातल्या  भजनी बुवांवरही जादू
Admin

रितेश देशमुखच्या ‘वेड' गाण्याची कोकणातल्या भजनी बुवांवरही जादू

वेड चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे.

वेड चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. महाराष्ट्रभर या दादा वहिनीची सध्या हवा पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील गाणं ‘वेड लावलंय’ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. सगळीकडे या गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. जो तो या गाण्यावर सोशल मिडियाच्या माध्यमातून रील बनवत आहे.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत ५० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. याच पार्श्वभूमीवर वेड गाण्याचा आणखी एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. कोकणातील भजनाचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. जो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कोकणात भजन आणि डबलबारी याची वेगळीच ओळख आहे. या व्हिडीओमध्ये भजन गाणारे बुवा ‘वेड लावलंय’ हे गाणं गाताना दिसत आहेत आणि शेवटी ते गाण्यातील रितेशची सिग्नेचर स्टेप करतानाही दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ ‘मी कोकणातलो’ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com