स्वा. सावरकरांनाही काँग्रेसची ऑफर होती - अभिनेते शरद पोंक्षे
Admin

स्वा. सावरकरांनाही काँग्रेसची ऑफर होती - अभिनेते शरद पोंक्षे

स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यातर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात अभिनेते शरद पोंक्षे उपस्थित होते.
Published by :
Siddhi Naringrekar

स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यातर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात अभिनेते शरद पोंक्षे उपस्थित होते. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले की, हिंदुत्वाची व्याख्या युवकांना समजून सांगण्यासाठी सावरकरांच्या विचारांची आवश्यकता आहे. हिमालयापासून ते सिंधु नदीपर्यंतचा प्रांत स्वतःची पुण्यभूमी मानणारे खरे हिंदू आहेत. स्वा. सावरकरांना इंग्रजांनी द्वेषापोटी नियम धाब्यावर बसवून शिक्षा दिली. असे पोंक्षे म्हणाले.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, तुरुंगातील शिक्षेतून बाहेर पडल्यानंतर १९३७ मध्ये त्यांना सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस पक्षांमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. मात्र हिंदू राष्ट्रवादाच्या विचारांशी प्रतारणा होता कामा नये, या विचारांती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही. असे शरद पोंक्षे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com