Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी
महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली लाडकी बहीण योजनेविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ १५०० वरून २१०० रूपये करण्याचं आश्वासन महायुती सरकारने दिलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं लक्ष याकडे वेधलं आहे. मात्र, आता लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणाला मिळणार याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
लाडकी बहीण योजना केवळ गरजू महिलांसाठीच
ज्या महिला पगार घेतात किंवा आयकर भरतात अशा महिलांना आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असलेल्या महिलांना आणि गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
गरजू महिलांना दिलासा
लाडकी बहीण योजनेतील सर्व त्रुटी दूर करून गरजू महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. ज्या महिलांना दीड हजार रुपयांचं मोल कळते, त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं वक्तव्य जालना येथे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी केलं आहे. यामुळे अनेक गरजू महिलांना दिलासा मिळाला आहे.
२१०० रूपये कधी मिळणार?
दरमहा १५०० ऐवजी २१०० रूपये कधी मिळणार याविषयी लाडक्या बहिणींकडून विचारणा केली जात होती. याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मार्च महिन्यापासून महिलांना 2100 रुपये दरमहिन्याला दिले जातील, अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
कधी मिळणार जानेवारी महिन्याचा हफ्ता?
जानेवारी महिन्याचा हफ्ता २६ जानेवारी आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.