Vikram Gokhale
Vikram GokhaleTeam Lokshahi

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावली, पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

विक्रम गोखले यांनी मराठी - हिंदी, नाटक, चित्रपट, मालिका यांच्या माध्यमातून गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे.

मराठी चित्रपट श्रुष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केलेले अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या १५ दिवसांपासून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. आज असे अपडेट समोर आले असून त्यांची प्रकृती बिघडली आहे आणि त्यांनी डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देणे थांबवले. त्यांची प्रकृती आता चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप याविषयी कोणतेही निवेदन किंवा माहिती समोर आलेली नाही.

अभिनेते विक्रम गोखले यांनी गेल्याच महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी ८२ वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर काहीच दिवसात अभिनेत्याच्या तब्येतीविषयी चिंताजनक माहिती समोर आली आहे. विक्रम यांनी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि सिनेमा हे सर्वच व्यासपीठ गाजवले आहेत. रंगभूमीवर तर त्यांनी एक मोठा काळ गाजवला आहे. सध्या विक्रम गोखले 'तुझेच मी गीत गात आहे' या स्टार प्रवाहवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com