बजरंग दलाचा 'पठाण'ला असलेला विरोध झाला शांत; 'यामुळे'विरोध करणार नसल्याचे केले जाहीर
407580997021101

बजरंग दलाचा 'पठाण'ला असलेला विरोध झाला शांत; 'यामुळे'विरोध करणार नसल्याचे केले जाहीर

पुणे आणि नाशिकमध्ये पठाण सिनेमा हाऊसफुल्ल आहे. तसेच सांगलीतील शाहरुख खान फॅन क्लबच्या ग्रुपने अख्ख थेटर बुक केले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुणे आणि नाशिकमध्ये पठाण सिनेमा हाऊसफुल्ल आहे. तसेच सांगलीतील शाहरुख खान फॅन क्लबच्या ग्रुपने अख्ख थेटर बुक केले आहे. सकाळी 8.30 वाजता सेलिब्रेशन करून थेटरमध्ये चित्रपट पाहण्यास जाणार आहेत. दुसरीकडे बजरंग दलाने पठाण चित्रपटाला विरोध दर्शवत पठाण चित्रपट प्रदर्शित करू नका, असे निवेदन दिले होते. बेशरम रंग गाण्यातील दीपिका पादुकोणने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीवरुन सुरु झालेला वाद चांगलाच पेटला आहे. बजरंग दलाने सांगलीत हा चित्रपट प्रदर्शित करु नये असे सांगितले आहे. चित्रपटगृह चालकांना पठाण चित्रपट प्रदर्शित न करण्याची विनंती केली. पठाण चित्रपट प्रदर्शित केल्यास आंदोलन करु, असा इशाराही बजरंग दलाने दिला होता.

आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला विरोध करणार नसल्याचे जाहीर केले आहे. सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेनुसार चित्रपटातील गाण्याचे वादग्रस्त बोल आणि दृश्ये काढून टाकण्यात आले आहे. आता हे गाणे पाहायचे की नाही याचा निर्णय दोन्ही संघटनांनी प्रेक्षकांवर सोडला आहे. विहिंपचे राज्य मंत्री अशोक भाई रावल यांनी निवेदनात म्हटले आहे की, चित्रपट निर्माते, थिएटर आणि मल्टिप्लेक्स मालक हे चित्रपटसृष्टीचे भागीदार आहेत, परंतु त्यांनी धर्म, संस्कृती आणि देशाचा आदर लक्षात घेऊन अशा चित्रपटांना विरोध केल्यास विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरावे लागणार नाही. हा चित्रपट पाहायचा की नाही याचा निर्णय आता प्रेक्षकांनी घ्यायचा आहे, असे ते म्हणाले.

तसेच त्यांनी सांगितले की, अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या पठाण चित्रपटातील गाण्यातील काही दृश्ये आणि बोलांवर हिंदू समाजाचा आक्षेप होता. विहिंप आणि बजरंग दलाने त्याला विरोध केला होता. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेनुसार चित्रपटातील गाण्याचे वादग्रस्त बोल आणि सीन काढून टाकण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com