Viral News
Viral News Viral News

Viral News : लग्नाआधीचा थरारक क्षण: दोन तास आधी X बॉयफ्रेंडची भेट, मिठी-किस आणि व्हिडिओ व्हायरल

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला एक व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नवरीच्या पोशाखात असलेली एक तरुणी लग्नाच्या अगदी आधी तिच्या जुन्या प्रियकराला भेटण्यासाठी गेलेली दिसते.
Published by :
Riddhi Vanne
Published on

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला एक व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नवरीच्या पोशाखात असलेली एक तरुणी लग्नाच्या अगदी आधी तिच्या जुन्या प्रियकराला भेटण्यासाठी गेलेली दिसते. पुढे घडलेला प्रकार पाहून अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.

पहिलं प्रेम सहज विसरता येत नाही, असं अनेकांचं मत आहे. त्यामुळेच लग्नाच्या अवघ्या दोन तास आधी आयुष्य बदलणाऱ्या निर्णयापूर्वी ती तरुणी एक शेवटची भेट घ्यायची इच्छा व्यक्त करते. हा धोका पत्करून ती एक्स बॉयफ्रेंडला भेटायला जाते. हा व्हिडिओ 13 डिसेंबर रोजी @chalte_phirte098 या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून त्यानंतर तो मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसतं?

या व्हिडिओमध्ये नवरीच्या वेशातली तरुणी एका मित्रासोबत कारमधून येते. ती फोनवर बोलत असते आणि भेटीचं ठिकाण “वैष्णव केमिस्ट” असल्याचं सांगते. कारमधून उतरताना मित्र तिला आठवण करून देतो की लग्नाचे विधी सुरू व्हायला फक्त दोन तास उरले आहेत.

मित्र सांगतो की ही तरुणी शेवटच्या वेळेस तिच्या प्रियकराला भेटू इच्छित होती. तिच्यावर कुटुंबाकडून लग्नासाठी दबाव असल्याचंही तो नमूद करतो. ही कथा अपूर्ण राहिलेल्या प्रेमाची असल्याचं त्याचं म्हणणं आहे. व्हिडिओत ती तरुणी प्रियकराशी संवाद साधते, त्याला मिठी मारते आणि किस करते. त्यानंतर ती पटकन परत कारमध्ये बसून निघून जाते.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

या व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी प्रश्न विचारला की इतकं प्रेम असेल तर लग्न का करताय? दुसऱ्याचं आयुष्य का बिघडवताय? तर काहींनी होणाऱ्या नवऱ्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. काही युझर्सनी लग्नानंतर तिच्या नात्यांबाबत शंका व्यक्त केली, तर अनेकांनी हा व्हिडिओ फक्त नाटक असल्याचं म्हटलं आहे. एकूणच, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com