Pune Shaniwar Wada : शनिवार वाड्यातील नमाज पठण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल! काय आहे नेकमा प्रकार? जाणून घ्या...
पुण्याच्या शनिवारवाड्यासमोरील उद्यानात मुस्लीम लोकांमार्फत नमाज पढण्याचा एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार समाजमाध्यमांत व्हायरल करण्यात आला आहे. ज्यामुळे शांत असलेल्या पुण्यात खळबळ उडाली आहे. हिंदू कार्यकर्त्यांनी पुण्यातील शनिवार वाडा आवारात असलेल्या दर्गा बाहेरील दिवा काढला आहे.
यावेळी तिथे पतित पवन संघटना आणि सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते जमा झाल्याचं पाहायला मिळाल आहे. थोड्याच वेळात पतीत पावन संघटना व राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी शिववंदना करणार आहेत. यामुळे पुण्यातील शनिवार वाड्याच्या परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त याठिकाणी पाहायला मिळत आहे. पोलिसांनी विनंती केल्यानंतर ही आंदोलक झेंडा लावण्यावर ठाम असल्याचं दिसत आहे.
पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले आंदोलकाशी समजूत काढत आहेत. शनिवार वाड्यात असलेली पीर ही अनधिकृत असल्याचा सकल हिंदू समाजाचा आरोप आहे. तसेच शनिवार वाड्यात कोणाची ही पीर किंवा कबर नसल्याचे हिंदू संघटनांचे म्हणणे आहे. याठिकाणी असलेला पीरचा बोर्ड काढून टाका, हिंदू संघटनांची मागणी आहे. त्याचसोबत मेधा कुलकर्णी यांच्याकडून प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.