Sreeleela Video Viral : गर्दीचा फायदा घेत चाहत्याने श्रीलीलाचा हात धरुन खेचलं अन्...; कार्तिक आर्यनचे लक्ष मात्र भलतीकडेच

Sreeleela Video Viral : गर्दीचा फायदा घेत चाहत्याने श्रीलीलाचा हात धरुन खेचलं अन्...; कार्तिक आर्यनचे लक्ष मात्र भलतीकडेच

साऊथची लोकप्रिय अभिनेत्री श्रीलीला आणि कार्तिक आर्यन एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

साऊथची लोकप्रिय अभिनेत्री श्रीलीला आणि कार्तिक आर्यन एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. यातच आता श्रीलीला आणि कार्तिक आर्यनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यन आणि श्रीलीला त्यांच्या टीमसोबत एकत्र पाहायला मिळत असून त्यांच्याभोवती प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे. यामध्ये तो श्रीलीलाच्या पुढे चालत होता आणि श्रीलीला त्याच्या मागे होती. मात्र अचानक काही लोकांनी श्रीलीलाला धरले आणि गर्दीत खेचले. अभिनेत्रीच्या टीमने लगेच श्रीलीलाला त्या गर्दीतून बाहेर काढत वाचवले.

यामध्ये श्रीलीला खूप घाबरलेली दिसत होती. मात्र ही घटना घडताना अभिनेता कार्तिक आर्यनचे लक्ष भलतीकडेच असल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ पाहून चाहते चांगलेच संतापले असून यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com