Vidhan Parishad Election 2025: विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Vidhan Parishad Election 2025: विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी येत्या 27 मार्चला निवडणूक होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी येत्या 27 मार्चला निवडणूक होणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून भाजपकडून तीन जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांच्या नावांची भाजपकडून घोषणा करण्यात आली आहे.

प्रत्येकी एक एक जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे मात्र अद्याप शिवसेनेसह राष्ट्रवादीकडूनही उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली नाही आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com