चंद्रपूर जिल्ह्यात विज तांडव ; तिघांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात विज तांडव ; तिघांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात विज तांडवामुळे तिघांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
Published by :
shweta walge
Published on

अनिल ठाकरे,चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात विज तांडवामुळे तिघांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. जिल्हाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील पाटण, चिखली येथील दोन महिलांचा मृत्यू झाला तर मारई पाटण येथिल एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. वंदना कोटनाके , भारुला कोरांगे ,चंद्रकांत टोपे असे मृतकांची नावे आहेत. तर तिघे जखमी आहेत.

माहीतीनुसार , शेतीची कामे आटोपून पाच महीला घराकडे निघाल्या होत्या. त्या दरम्यान विज कोसळली. यात वंदना चंदू कोटनाके, भारूला अनिल कोरांगे या महीलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर इतर तीन महीला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना पाटण येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

जिवती तालुक्यातील दुसऱ्या घटनेत एका शेतकऱ्याचा वीज पडून मुत्यू झाला आहे. चंद्रकांत ठुमके असे मृतकाचे नाव आहे. मारईपाटण येथील शेतकरी चंद्रकांत ठुमके हे शेतात काम करीत होते. याचदरम्यान वीज कोसळली. यात ते जखमी झाले. त्यांना गडचांदुर येथील आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांचा मुत्यू झाला. या दुदैवी घटनेमुळे जिवती तालुक्यात शोककळा पसरली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com