Vijay Kumbhar : 'अब्दुल सत्तार यांनी शासकीय अनुदान लाटले'; विजय कुंभार यांचा आरोप

Vijay Kumbhar : 'अब्दुल सत्तार यांनी शासकीय अनुदान लाटले'; विजय कुंभार यांचा आरोप

माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. विजय कुंभार म्हणाले की, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर असल्याचे भासवून शासकीय अनुदान लाटले आहे.

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेंतर्गत, २०१५ पासून २ लाख रुपये वार्षिक अनुदान दिले जात होते. तथापि, ४ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत अनुदान वाढीबाबत कोणताही प्रस्ताव नव्हता, तरीही तो प्रस्ताव मंजूर झाल्याचे भासवून ७ ऑक्टोबर रोजी अनुदान १० लाख रुपयांपर्यंत वाढवले गेले आणि १६ शाळांना मंजूरही झाले.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, या शाळांचा संबंध अब्दुल सत्तार यांच्याशी असल्याचा संशय असून, संपूर्ण प्रक्रिया अवघ्या ६ दिवसांत पूर्ण करण्यात आली. हे प्रकरण बेकायदेशीर असल्याने संपूर्ण चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मी केली आहे. असे विजय कुंभार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com