विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा; आज भूमिका जाहीर करणार

विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा; आज भूमिका जाहीर करणार

लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published on

लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर विजय शिवतारे ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांची 'वर्षा' या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत विशेष बैठक पार पडली.

या बैठकीत शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली सांगून त्याद्वारे विजय शिवतारे यांच्या मनातील सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यात यश आल्याची माहिती मिळत आहे.

आज आपण या बैठकीतील चर्चेबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर विस्तृतपणे मांडणार असल्याचे शिवतारे यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com