'जुन्या कढीला ऊत' वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा

'जुन्या कढीला ऊत' वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा

मराठवाड्यात आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावरच मराठवाड्यात सरकार आलं आणि नुसत्या घोषणा करून निघून गेलं अशी टीका
Published by  :
shweta walge

मराठवाड्यात आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावरच मराठवाड्यात सरकार आलं आणि नुसत्या घोषणा करून निघून गेलं अशी टीका विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या पत्रकार परिषदेवर केली आहे. तर कॅबिनेट नावाखाली बनवा बनवी पुन्हा घोषणांच्या नावाखाली जुन्या कढीला ऊत अशा शब्दात वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

मराठवाड्यात सरकार आले आणि नुसत्या घोषणा केल्या आणि निघून गेले. कॅबिनेट नावाखाली बनवा बनवी पुन्हा घोषणांच्या नावाखाली जुन्या कढीला ऊत अशा शब्दात त्यांनी टोला लगावला आहे. तसेच २०१६मध्ये ज्या घोषणा केल्या त्याच पुन्हा २०२३ मध्ये कराव लागतं. छत्रपती संभाजीनगर धाराशिव नामांतर निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज निर्णय देण्याचा निर्णय आघाडी सरकारचा होता. मराठवाडा दुष्काळ छायेत आहे. दुष्काळाची घोषणा होईल पाऊस नाही जनतेची अपेक्षा होती. शेतकऱ्यांना मदत मिळेल मात्र नुसत्या घोषणा केल्या आमच्या टिकेनंतर फक्त शासकीय विश्रामगृहात राहिले. असं म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडला आहे.

'जुन्या कढीला ऊत' वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा
मराठवाड्याला ५९ हजार कोटींचं पॅकेज, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

मराठवाड्यात दुष्काळ घोषित करण्याचे पाऊल सरकारने अद्याप उचललेलं नाही. दोन महिन्यात तेराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सरकार सरसकट कर्जमुक्तीची घोषणा करेल असं वाटत होतं. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोडण्यासाठी सरकार मराठवाड्यात गेलंय काय? आम्ही सरकारचा निषेध करतोय. मराठवाड्यातील जनता यांना माफ करणार नाही. केवळ घोषणा करण्यासाठी आणि तोंडाला पान पुसण्यासाठी कॅबिनेट ची घोषणा झाली असे वडेट्टीवार म्हणाले

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com