'हे सरकार घाबरल्याचे लक्षणं' असं का म्हणाले वडेट्टीवार?
मुंब्य्रातील शिवसेनेची मध्यवर्ती शाखा शिंदे गटाने ताब्यात घेत बुलडोझरने पूर्णपणे जमीनदोस्त केली. यावरच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे.
ते म्हणाले की, सरकार घाबरल्याचे हे लक्षण आहे, शासकीय यंत्रणेचा आणि पोलिसांचा दुरुपयोग करणे सुरू झाला आहे, हेच मुंब्य्राच्या घटनेवरून सिद्ध झाला आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्यांना स्वतःच्या विचारापासून थांबवणे हा लोकशाहीचा गळा घोटने आहे आणि ते काम राज्यात सुरू झाला की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे, असंह वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुंब्य्रातील शिवसेनेची मध्यवर्ती शाखा शिंदे गटाने ताब्यात घेत बुलडोझरने पूर्णपणे जमीनदोस्त केली. या शाखेत ठाकरे गटाचे पदाधिकारी गैरकारभार करत असल्याचा आरोप शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तर शिंदे गटाला या शाखेच्या ठिकाणी व्यावसायिक गाळे उभारायचे असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. त्यामुळे येत्या काळात शिवसेना शाखा ताब्यात घेण्याच्या वादातून ठाण्यात पुन्हा वाद उफाळण्याची शक्यता आहे.