"मेन स्ट्रीममध्ये येण्यासाठी...", 26/11 हल्ल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन वडेट्टीवार यांचा माधव भंडारी यांच्यावर पलटवार
मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 साली आतंकवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप जीव मारले गेले. दरम्यान आता या हल्ल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली होती. "मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यामध्ये कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचा हात होता",असा खळबळजनक दावा केला होता. भंडारी यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती. अशातच आता कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले कि, "सध्या माधव भंडारी यांना चिंता आहे. माधव भंडारी भाजपमध्ये त्यांची इच्छापूर्ती काही होत नाही त्यामुळे बिचाऱ्यांना असं काहीतरी स्टेटमेंट करून खळबळ उडवून त्यांना मेन स्ट्रीममध्ये येण्यासाठी आणि संविधानिक पदापासून दूर ठेवल्यामुळे ते मिळवण्यासाठी त्यांचा खटाटोप असू शकतो. जे आरोप माधव भंडारी यांनी केले खरं म्हणजे एखाद्या रस्त्यावरच्या माणसांनी करावे असे ते आरोप आहेत".