ताज्या बातम्या
Vijay Waddetiwar : "धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरुन काढलं तरच सरकारची इज्जत राहील"
विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.
विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, भ्रष्टाचारामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे. त्यांना मंत्रिपदावरुन लवकरात लवकर काढलं तरच सरकारची इज्जत राहील. नाहीतर आहे ते ही घालवून बसतील.
हे सरकार भ्रष्टाचाऱ्यांचे सरकार आहे. फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांचे सरकार असा मेसेज जाईल यांना थोडतरी कळायला पाहिजे. एकावर किती प्रकारचे आरोप झालेत आणि तो मंत्री तरी त्या पदावर कायम राहतो.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, कितीही खाल्लं तरी काही कारवाई करायची नाही असं सरकारचे धोरण असेल त्यावेळेच्या शिंदे सरकारचे आणि आताच्या फडणवीस सरकारचे तर मग आता त्याला काही इलाजच नाही. असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.