'मतांचा जोगवा मिळावा म्हणून शासकीय पैश्याची उधळपट्टी' वडेट्टीवारांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका

'मतांचा जोगवा मिळावा म्हणून शासकीय पैश्याची उधळपट्टी' वडेट्टीवारांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका

लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी सरकार राज्यभर महायुतीमधील पक्ष विशेष कार्यक्रम घेत आहेत. यातच आज नागपूरमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला.
Published by :
shweta walge
Published on

लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी सरकार राज्यभर महायुतीमधील पक्ष विशेष कार्यक्रम घेत आहेत. यातच आज नागपूरमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला. याच कार्यक्रमावर टीका करत विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारी तिजोरीची उधळपट्टी करून सरकारी पैसे खर्च करण्यात सरकार व्यस्त आहे. फॅशन शोमध्ये जसा रॅम्प असतो तसा रॅम्प नागपूरच्या कार्यक्रम स्थळी केला सरकार रॅम्पवर चालत आहे, अस म्हणत निशाणा साधला आहेत. आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले की, 4 कोटी रुपये खर्च एका कार्यक्रमात करून जनतेच्या पैश्यावर मस्तवाल पणा सरकार करत आहे. मतांचा जोगवा मिळावा म्हणून शासकीय पैश्याची उधळपट्टी केली जात आहे. जनतेच्याकडून घेतलेला टॅक्स, GST रुपात वसूल केलेला पैसे योजनेत खर्च केले जात आहे. महिलांच्या साडी वर 18 टक्के GST लावला जातोय. तेल, पेट्रोल, डिझेल, जीवनावश्यक वस्तू महाग झाले असताना महागाई कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत नाही. राज्याचा विकास दर 6.5 टक्के झाला, राज्य अधोगतीला जातोय.असे कार्यक्रम घेऊन आम्हीच लाडके भाऊ आणि बहीण असल्याचं दाखवील जात आहे.

पुढे ते म्हणाले की, चंद्रपूरमधील वरोरामध्ये लोकमान्य विद्यालयात मागासवर्गीय मुलींवर अत्याचार झाले. धनंजय परके त्यातील आरोपी शिक्षक असून तो ABVP जिल्हाध्यक्ष. बदलापूर मध्ये पण ह्याच विचारांची शिक्षण संस्था होती.

नागपूर शहरात महिला अत्याचाराच्या 524 घटना घडल्या. पोलीस चाल ढकल कारवाई करत असल्याने आरोपींची हिंमत वाढत आहे. 1 जानेवारी पासून 2837 महिला अत्याचार घटना राज्यात घडल्या.

मध्य प्रदेशमध्ये महिलांच्या खात्यात पैसे टाकणे बंद झाले, राज्यातील महिलाची फसवणूक केली जात आहे. सत्तामिळून खाताना मजा वाटत आहे, मावस भाऊ मिळून खाऊ आता निवडणूक आल्यावर याना सोबत राहायला किळस वाटतो. आमचे सरकार आल्यावर सावंत कुठे असतील हे दिसेल इतका भ्रष्टाचार आरोग्य खात्यात होत आहे. इतका भ्रष्टाचार होत असताना फडणवीस का शांत आहे अस प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे.

संजय राठोड यांनी मुंबईमध्ये जमीन बळकावली, धर्मील ट्रस्ट च्या नावाने जमीन मागून खाजगी नावाने जमीन करून घेतली. 8 हजार करोड रुपयांचे टेंडर काढले. आपले पाप झाकून लाडकी बहीण योजना आणून सरकारला मत मिळवायचे आहे.

वापरा आणि फेका ही अजित पवार विषयी भाजपची भूमिका दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला एक जागा मिळाली, त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात पोट शूळ उठला आहे. हिस्सेदार वाढले तर त्यात वाटा नको पुन्हा सत्ता आली तर हिस्सेदार वाढतील म्हणून अजित पवारांना याना दूर करायचे आहे.

देशाचा विकासदर घाटला आहे, देशावर कर्जाचा प्रचंड डोंगर आहे, आयात आणि निर्यात कमी आहे, प्रोडक्शन कमी झाले, मोदी सरकारचे हे अपयश आहे, अस ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com