Vijay Waddetiwar : 'लोकांची फसवणूक करून आणि लोकांना लुबाडून सत्तेत आलेलं हे सरकार आहे, सिद्ध झालंय!'

एसटी भाडेवाढीच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर कठोर शब्दात टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, हे सरकार लोकांना लुबाडून सत्तेत आले आहे आणि त्यांच्या धोरणांमुळे लोकांच्या खिशावर भार पडत आहे.
Published by :
Team Lokshahi

विधानसभेच्या निवडणुकीनंतर चर्चेत असलेला विषय म्हणजे 'लालपरी'. मागील तीन वर्ष निवडणुकींमुळे भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला नाही. पण यावर्षी 'महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ' (एसटी) च्या भाडेवाढचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

एसटीची भाडेवाढ दरवर्षी ५ टक्यांनी केली जाते, परंतु मागील तीन वर्ष निवडणुकींमुळे ही भाडेवाढ करता आली नाही. त्याचप्रमाणे तीन वर्षाच्या भाडेवाढीचा प्रस्ताव, यावर्षी देण्यात आला आहे. दरवर्षी ५ टक्के याप्रमाणे ३ वर्षाचे १५ टक्के भाडेभाव असा प्रस्ताव महापरिवहन सेवेने दिला आहे. वाढत्या महागाईमुळे तिकीटाचे दर वाढणे गरजेचे आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले होते. तिकीट दरापेक्षा १५ टक्के याप्रमाणे ६०-८० रुपये जास्त तिकीटदर करण्याच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आली आहे. २५ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ही भाडेभाव चालू होईल.

या भाडेवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार माध्यामांशी बोलताना म्हणाले कि, "ज्या परिस्थितीमध्ये हे सरकार चालेलं आहे. मग एसटी भाडेवाढ करतील किंवा लोकांवर भूरदंड टेकतील, रिक्षाचे भाडेवाढ करतील, आणि लोकांना लुटतील... चार वर्ष लुटतील पाचव्या वर्षी वाढतील हजार रुपये प्रमाणे खोटी आश्वासन देतील, पुन्हा सत्तेवर येतील... लोकांची फसगत करुन हे सरकार आलेले आहे, हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे या सरकारला कोणत्याही प्रकारची लाजबीज बाळगायची आवश्यकता नाही. बिंदास्तपणे लुटा बिंदास्तपणे वाटा आणि बिंदास्तपणे सत्तेचा उपभोग घ्या. असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com