Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची भेट घेतल्यानंतर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान, म्हणाले; "मी शेवटपर्यंत सत्ता, पदाचा विचार..."

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आंदोलक मनोज हाके यांची भेट घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.
Published by :

Vijay Wadettiwar Press Conference : ओबीसी समाजाच्या लढ्यासाठी वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांचं आंदोलन सुरु आहे. तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी हाके यांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज हाके यांची भेट घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

लक्ष्मण हाके यांनी ओबीसींची फार मोठी शक्ती उभं करण्याचं काम केलं आहे. ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल, त्यावेळी लक्ष्मण हाकेंच्या नावाची पुस्तकात नोंद केली जाईल. समाजाप्रती तुम्ही जी भूमिका घेतली, त्याबद्दल मी तुमचं अभिनंदनही करू शकत नाही. कारण मनात वेदना आहेत. तुम्ही जे समर्पण केलं आहे, त्याबद्दल मला तुमचं कौतुक आहे. ओबीसी बांधवांना सांगतो की, मी शेवटपर्यंत सत्ता, पदाचा विचार करणार नाही. माझ्यासाठी ओबीसी बांधव महत्त्वाचा आहे. मी ओबीसी समाजाच्या पाठिशी उभा राहिल. हा मी तुम्हाला शब्द देतो.

मी ओबीसींचा कार्यकर्ता आहे. त्यांनी जे आंदोलन सुरु केलं आहे, त्या सर्व मागण्या मला माहित आहेत. त्या मागण्यांवर आमचं सर्वांचं एकमत आहे. त्या मागण्यांवर उदया चर्चा होईल. आमची न्यायलयीन लढाई आहे. आम्ही न्यायालयीन लढाई लढत राहू. यापूर्वी पश्चिम बंगालनेही २०१० नंतर आलेले सर्व जातीचे आरक्षण रद्द केले. ओबीसीमध्ये ज्या जाती आल्या त्यांचंही आरक्षण पश्चिम बंगाल हायकोर्टाने केलं आहे. कुणी चुकीचं काही करेल आणि ते टीकेल, असा काही विषय नाही. पण हे सरकार आमच्यात भांडण लावून स्वत:ची पोळी भाजण्याचं काम करत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com