आम्ही दिल्लीला नाना पटोले यांची तक्रार करण्यासाठी गेलो नाही - विजय वडेट्टीवार
Admin

आम्ही दिल्लीला नाना पटोले यांची तक्रार करण्यासाठी गेलो नाही - विजय वडेट्टीवार

आम्ही दिल्लीला नाना पटोले यांची तक्रार करण्यासाठी गेलो नाही
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कल्पना नळसकर- असूर, नागपूर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसच्या आदिवासी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वाखातील शिष्टमंडळाने पक्ष अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सरचिटणीस के सी वेणू गोपाल आणि प्रदेश प्रभारी के सी पाटील यांची भेट घेत राज्यातील राजकीय स्थिती व संघटनात्मक कार्यपद्धतीची माहिती दिल्याचे चर्चा होत्या पण आम्ही सोबत गेलो नव्हतो.

तर कर्नाटकमध्ये जो विजय मिळाला त्याचा साठी सदिच्छा भेट देण्यासाठी गेलो होतो अशी प्रतिक्रिया माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. सोबत नाना पटोले यांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावे अशीही प्रतिक्रिया दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com