महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे संकेत; विजय वडेट्टीवार म्हणाले...

महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे संकेत; विजय वडेट्टीवार म्हणाले...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यातून बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचे संकेत दिलेत.

उद्धव ठाकरे म्हणाले की, काही काळामध्ये महापालिका निवडणुका येणार आहेत. मी सगळ्यांशी बोलतो आहे. सगळ्यांचे मत आहे की एकटे लढा. अजून निवडणूक जाहीर झालेली नाही. पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या. ज्या भ्रमात आपण राहिलो. त्या भ्रमातून पहिलं बाहेर या. ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाली. मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, आनंद आहे, हे वारंवार होत आहे. शेवट आपण आनंदच म्हटला पाहिजे. आम्ही आमचे प्रयत्न करु. आघाडी असावी, आघाडी टीकावी. आघाडीने एकत्र यावं. पण त्यांनी जर भूमिका स्विकारली असेल तर त्याला कुठला इलाज आहे. ज्यांची त्यांची स्वतंत्र विचारधारा, स्वतंत्र पक्ष आहेत. आम्ही आपल्या पद्धतीने लढू. कदाचित त्यांच्या भूमिकेच्यासंदर्भात अद्याप कुठलीही स्पष्टता नाही किंवा तशी हायकमांडसोबत आमची चर्चासुद्धा झालेली नाही. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com