Vijay Wadettiwar : ठाकरे बंधूंची युती जाहीर; विजय वडेट्टीवार म्हणाले...
बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Vijay Wadettiwar) ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा झाली. अनेक दिवस राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांची युती कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज अखेर ब्ल्यू सी हॉटेलमध्ये ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद झाली.
या पत्रकार परिषदेतून ठाकरे बंधू यांनी त्यांच्या युतीची घोषणा केली. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, "मुंबईमध्ये उद्धवजी आणि राजजी जर एकत्र येत असतील दोन भाऊ तर नक्की आम्हाला आनंद आहे. एक कुटुंब एकत्र येऊन निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र येत असतील आणि एकत्र लढत असतील त्यामध्ये आम्हाला दु:ख होण्याचे काहीही कारण नाही. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना या निवडणुकीमध्ये यश मिळो अशी भावनासुद्धा आम्ही व्यक्त करतो." असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
Summary
ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा
ठाकरे बंधूंच्या युतीवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
"आम्हाला दु:ख होण्याचे काहीही कारण नाही"
