'काँग्रेस पक्षात मोठी फूट?' गिरीश महाजनांच्या वक्तव्याने विजय वडेट्टीवार संतापले

'काँग्रेस पक्षात मोठी फूट?' गिरीश महाजनांच्या वक्तव्याने विजय वडेट्टीवार संतापले

गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारण ढवळून निघालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राजकारणात मोठा भूकंप झाला.
Published by  :
shweta walge

गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारण ढवळून निघालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राजकारणात मोठा भूकंप झाला. या सर्व घडामोडींनंतर भाजप नेते गिरीश महाजन यांनी काँग्रेसबद्दल खूप मोठा दावा केला आहे. गिरीश महाजन यांनी काँग्रेस पक्षात मोठी फूट घडून येणार असल्याचे संकेत दिले आहेत. यावरच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या चांगल्याच संतापले आहेत. त्यांनी अतिशय खोचक शब्दांमध्ये गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

“मुंगेरीलाल के हसीन सपने, तशी गोष्ट आहे. गिरीश महाजन काय, गिरीश महाजनांच्या 20 पिढ्या आल्या तरी राज्यात काँग्रेसला फोडू शकणार नाहीत एवढं दाव्यावने मी सांगतो”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

काय म्हणाले होते गिरीश महाजन?

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आले, पण काँग्रेसला सध्या थांबवलं आहे, असं मोठं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय. राज्यातील सरकारमध्ये सगळे पक्ष असल्याचं मोठं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पण गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आल आहे.

'काँग्रेस पक्षात मोठी फूट?' गिरीश महाजनांच्या वक्तव्याने विजय वडेट्टीवार संतापले
Rice Export : आता कांद्यानंतर तांदूळ निर्यातीवर निर्बंध!

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com