Vikramsingh Pachpute : विक्रमसिंह पाचपुते यांचा बनावट पनीरबाबत अन्न व औषध प्रशासनाला सवाल

विक्रमसिंह पाचपुते यांनी विधानसभेत बनावट पनीरचा मुद्दा उपस्थित केला, अन्न व औषध प्रशासनाकडे जनजागृतीची मागणी केली.
Published by :
Prachi Nate

विक्रमसिंह पाचपुते हे विधानसभेत बनावट पनीर घेऊन आले आणि म्हणाले की, आपण जे रोज पनीर खातो त्यात फक्त दुधाची पावडर आणि व्हेजिटेबल फॅक्ट टाकून हे पनीर बनवलं जात. माझी प्रशासनाला विनंती आहे की, आपण समाजात जनजागृती केली पाहिजे. आपल्या अन्नातले 70-75 % पनीर कृत्रीम आहे. एकीकडे पनीर, तर दुसरीकडे पनीर सारखे दिसणारे अॅनॉलॉग चीज आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे बनावट पनीर दिले. लहान मुलांना आपण अन्न म्हणून पनीरच्या नावाखाली विष खाऊ घालत आहे. हे तेलाचे गोळे आहेत, असं ते म्हणाले आहेत.

तसेच पुढे ते म्हणाले की, मी प्रश्न मांडला तर धाडी पडल्या, १५ लाख किंमतीचे पनीर पुणे व चंद्रपूर मध्ये सापडले. एफडीए मध्ये मोबाईल लॅब आणणार होता, त्याचे काय झाले? कायद्यात कठोर कारवाईसाठी तरतूद नाही. ही गंभीर बाब आहे. महत्त्वाची तरतूद करणार का? तुम्ही पनीर खाऊन पाहा. हा एकट्याचा व मतदारसंघाचा प्रयत्न नाही. अस म्हणत विक्रमसिंह पाचपुते बनावट पनीर च्या मुद्द्यावर भडकले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com