महाराष्ट्रात बंदी असलेल्या विमल गुटख्याची जिल्ह्यात सर्रास विक्री, संबंधित विभागाचे दुर्लक्ष

महाराष्ट्रात बंदी असलेल्या विमल गुटख्याची जिल्ह्यात सर्रास विक्री, संबंधित विभागाचे दुर्लक्ष

महाराष्ट्रात बंदी असलेल्या विमल गुटख्याची जिल्ह्यात सर्रास विक्री

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार

महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमा वरती भागात नंदुरबार जिल्हा वसलेला असून या जिल्हा कडे व येथून गुजरात राज्याकडे जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते दररोज हजारो वाहने ये जा करीत असताना याची सीमावरती भागात चौकशी होत नसल्याने जीव घेण्यासारख्या विमल गुटख्याची तस्करी दिवसाढवळ्या मोठ्या स्वरूपात होत असल्याचे चित्र समोर येत आहे. नंदुरबार शहरात विमल गुटख्याची देवाण-घेवाण करणाऱ्या ठेकेदारांची मोठी साखळी असताना त्यांना पाठीशी घालणाच्या प्रयत्न जिल्हा पोलीस प्रशासन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. गुजरात राज्यातून दैनंदिन विमल गुटका नंदुरबार जिल्हा मार्गे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविला जातो .

आज गावागावात व प्रत्येक टपरीवर महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा सर्रासपणे विकताना दिसत आहे.सदर तस्करी हे मोठमोठ्या वाहनातून केली जाते .नंदुरबार शहरात विमल गुटखा तस्करी करणाऱ्या ठेकेदारांचे मोठमोठे जाळे असून त्यांच्याविषयी एखादी तक्रार झाली तर संबंधित विभाग व पोलीस विभाग थातूरमातूर कारवाई करून आपल्या कार्याची अनुमती दर्शवते तोच कारवाई होत नसल्याचेच पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांची कामगिरी कौतुकास्पद असून यापूर्वी गुन्हे अन्वेषण शाखेतील तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी केलेली कारवाई समाधानकारक होती त्यांनी विमल गुटखा ठेकेदारांवर वचक बसवण्यात यश मिळवले होते परंतु आता पुन्हा या मुजोर ठेकेदारांनी डोके वर काढल्यामुळे पोलिसी कारवाईबाबत शासंकता व्यक्त होऊ लागली आहे. या मुजोर ठेकेदारांवर कायमस्वरूपी कारवाई करून त्यांच्या गाशा गुंडाळल्या जावा अशी प्रामाणिक अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com