शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंचे अपघातात निधन

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंचे अपघातात निधन

रायगडमध्ये विनायक मेटेंच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात विनायक मेटेंचे निधन झाले आहे.
Published on

रायगडमध्ये विनायक मेटेंच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात विनायक मेटेंचे निधन झाले आहे. वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला असून पुणे ते मुंबई प्रवास करताना मेटे यांचे वाहन अनोळखी वाहनावरती आदळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

यावेळी विनायक मेटेंसह त्यांच्या मुलगा देखील होता. मेटेंचा मुलगा गाडी चालवत असल्याची माहिती मिळत आहे. त्यांचा मुलगा देखील किरकोळ जखमी झाला आहे. त्यांच्यावर एम जी एम रूग्णालयात उपचार सुरु होते. विनायक मेटेंची अपघाताची बातमी मिळताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दरेकर हॉस्पिटलमध्ये रवाना झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com