Devendra Fadnavis - Vinayak Raut
Devendra Fadnavis - Vinayak RautTeam Lokshahi

"बाबरी पाडली तेव्हा भाजप नेते शेपूट घालून पळत होते"

विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
Published by :
Sudhir Kakde

सिंधुदुर्ग | समीर महाडेश्वर : बाबरी मशीद पाडली तेव्हा भाजपचे (BJP) सर्व वरिष्ठ नेते शेपटी घालून पळत होते असा सणसणीत टोला विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी लगावला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईत बुस्टर डोस सभेला संबोधित केलं, त्यावेळी शिवसेनेवर घणाघात केला होता. बाबरी मशिद पाडली तेव्हा शिवसेना (Shivsena) कुठं होती? एकही शिवसेनेचा नेत त्याठिकाणी नव्हता असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर आता विनायक राऊत यांनी फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे.

Devendra Fadnavis - Vinayak Raut
"कायद्यानं चालायचं म्हटलं तर काकड आरती, जाग्रण, सप्ताह सगळं बंद करावं लागेल"

देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देताना विनायक राऊत यांनी खोचक सवाल केला. ते म्हणाले देवेंद्र फडणवीसांना आता अक्कल दाढ आली का? 29 वर्षानंतर त्यांना कळलं का? ज्यावेळेला बाबरी मशीद पाडली तेव्हा भाजपचे सर्व वरीष्ठ नेते शेपटी घालून पळत होते, रडत होते, हे अख्ख्या देशाला माहिती आहे. त्यावेळेला बाबरी पाडणाऱ्यांना खंबीर आधार बाळासाहेब ठाकरेंनी दिला. मुख्यमंत्री होत नाही म्हणून देवेंद्रंचा स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यामुळे ते अशी वक्तव्ये करता आहेत असं विनायक राऊत म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis - Vinayak Raut
राज ठाकरेंकडून अटींचे उल्लंघन? गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले..
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com