राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात : विनायक राऊत

राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात : विनायक राऊत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी मुंबईतील गट प्रमुखांच्या मेळाव्यात अनेकांवर टीकास्त्र सोडले होते. राज ठाकरे यांनी 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील गोरेगावमधल्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. याच पार्श्वभूमीवर आता विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विनायक राऊत म्हणाले की, "राज ठाकरे फक्त नक्कल करुन राजकारण करत आहेत. बाळासाहेबांचं नाव घेऊन उद्धव ठाकरे यांची नक्कल करायची. पायाला ठेच लागली तरी तुम्ही मुंबईला अॅडमिट होता. उद्धव ठाकरे यांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर होतंय ही राज ठाकरे यांची पोटदुखी आहे."

यासबोतच ते म्हणाले की, "मनसेने फक्त स्वप्न पहावी, अस्तित्व नाही. निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात," असे विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी रत्नागिरीतील एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना हे वक्तव्य केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com