Vinayak Raut VS Rajan Salvi: शिवसेना प्रवेशाआधी राजन साळवीआणि विनायक राऊतांमध्ये जुंपली
राजन साळवी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामंत बंधूच्या नेतृत्त्वाखाली शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याचपार्श्वभूमिवर राजन साळवी लोकशाही मराठी सोबत बोलताना त्यांनी विनायक राऊत यांच्याविषयी काही गोष्टींचा खुलासा केला होता. विनायक राऊतांमुळे ते 2024ची निवडणुक पराभूत झाले आणि त्यांच्यामुळेच ते पक्ष सोडत आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं होत. यादरम्यान आता लोकशाही मराठीसोबत बोलत असताना विनायक राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
विनायक राऊत म्हणाले की, एकदा अपयश मिळाल की, सत्तेच्या हव्यासापोटी कोणावर तरी खापर फोडाव लागत. प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी घेतलेली धरसोड भूमिका आणि मतदार संघात असलेली त्यांची डागाळलेली प्रतिमा ही त्यांच्या पराभूताला कारणीभूत ठरली. हे त्यांना मान्य करावचं लागेल. रिफायनरीची दलाली करत असताना तिथल्या लोकांचा आक्रोश त्यांच्या कानावर आला नाही.
राजन साळवींबद्दल सांगायचं झालं तर शिंदे गटाचे जे आताचे आमदार आहेत, निलेश राणे यांनी तर प्रत्येक सभेत सांगितल होत साळवींनी त्यांच्याकडून किती पैसे घेतले. फार काही मला आश्चर्य वाटलेलं नाही. त्यांचा विधानसभेमध्ये पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी भविष्यासाठी मार्ग शोधायचा जो प्रयत्न केला होता त्याच्यातून भाजपमध्ये जाण्याचा सुचना त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन केला होता.
पण त्यांचं दुर्दैव की भाजपने त्यांच्यासाठी दरवाजे बंद केले आणि त्यामुळे नाईलाज असतो पुनश्च एकदा त्यांच्याशी लढले. त्यांच्या हाताखाली जाऊन शिंदे गटाच्या सामंत कुटुंबीयांच्या हाताखाली जाऊन त्यांना काम करावं लागत आहे हे त्यांचे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया विनायक राऊतांनी दिली आहे.