Iran vs Israel Viral Video : इराणमध्ये इज्रायली मोसादचे गुप्त ऑपरेशन; हल्ल्यांचा झाला पर्दाफाश

Iran vs Israel Viral Video : इराणमध्ये इज्रायली मोसादचे गुप्त ऑपरेशन; हल्ल्यांचा झाला पर्दाफाश

इज्रायलच्या गुप्तचर संस्था मोसादनं नुकत्याच इराणमधील विविध लष्करी आणि अणु सुविधांवर केलेल्या हल्ल्यांचे दुर्मिळ व्हिडिओ प्रथमच जगासमोर सादर केले आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

इज्रायलच्या गुप्तचर संस्था मोसादनं नुकत्याच इराणमधील विविध लष्करी आणि अणु सुविधांवर केलेल्या हल्ल्यांचे दुर्मिळ व्हिडिओ प्रथमच जगासमोर सादर केले आहेत. यामध्ये इराणमधील अणु संशोधक, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र उत्पादन केंद्रं आणि हवाई संरक्षण यंत्रणा यांच्यावर लक्ष केंद्रित करून केलेल्या हल्ल्यांचा समावेश आहे. व्हिडिओमध्ये एजंट्सचे चेहरे झाकलेले असून, त्यांच्या हालचाली स्पष्टपणे दाखवल्या आहेत.

जेरुसलेम पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, मोसादनं हे हल्ले इराणच्या आतून ड्रोनच्या सहाय्याने केले. इराणनं यापूर्वीही मोसादवर अशा प्रकारच्या हल्ल्यांचे आरोप केले आहेत. विशेषतः करजमधील अणु प्रकल्पावर 2021 मध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्याचा उल्लेख केला जातो.

गेल्या काही वर्षांत मोसादनं इराणमध्ये अनेक धक्कादायक गुप्त कारवाया केल्या आहेत. एप्रिल आणि ऑक्टोबर 2024 मधील ऑपरेशन्स, तसेच 2018 मध्ये इराणच्या अणु दस्तऐवज चोरण्याच्या घटनेमध्येही मोसादचा हात होता. या कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाचं लक्ष इराणच्या अणु कार्यक्रमाकडे वेधलं गेलं.

माजी पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या माहितीमध्ये सांगितलं होतं की, 2022 मध्ये मोसादनं 100 हून अधिक इराणी ड्रोन नष्ट केले होते. इराणनं मोसादवर नतांज, करज आणि इतर अणु ठिकाणांवरील हल्ल्यांबाबतही आरोप केले आहेत.

हे व्हिडिओ क्लिप्स मोसादच्या अत्यंत गोपनीय आणि नियोजनबद्ध कारवायांचा दुर्मिळ पुरावा आहेत. यामधून इराणच्या अणु आणि लष्करी क्षमतेवर केलेल्या थेट आरोपांचे स्पष्ट चित्र दिसते. मोसादने यापूर्वी कधीही आपल्या कारवायांची अधिकृत कबुली दिली नव्हती. आगामी काळात याचे परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवरही जाणवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Iran vs Israel Viral Video : इराणमध्ये इज्रायली मोसादचे गुप्त ऑपरेशन; हल्ल्यांचा झाला पर्दाफाश
DGCA Big Decision : विमान सुरक्षेसंदर्भातच सरकारचे आदेश, अटींची पुर्तता आवश्यक
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com