Virendra Sehwag And Wife Aarti
Virendra Sehwag And Wife Aarti

Virendra Sehwag ने पत्नी आरतीला इंस्टाग्रामवर केलं अनफॉलो, घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

वीरेंद्र सेहवागने पत्नी आरतीला इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे. दोघे मागील काही महिन्यांपासून एकत्र राहत नसल्याची माहिती मिळाली आहे.
Published by :
Published on

भारताचा माजी बॅट्समॅन वीरेंद्र सेहवागने पत्नी आरतीला इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. हिंदूस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या परिवारातील सदस्याने सूत्रांना दिलेल्या माहितीनुसार ते दोघे मागील काही महिन्यांपासून एकत्र राहत नाहीत. त्यामुळे घटस्फोटाची शक्यता वर्तवली जात आहे.

दोन आठवडे आधी वीरेंद्र सेहवाग पलक्कड येथील विश्व नागयक्षी मंदिरात गेले होते. यावेळी सेहवागने आपल्या फॅमिलीसोबतचे फोटो पोस्ट केले होते. मात्र, त्यामध्ये त्याची पत्नी आरती नव्हती. याआधी वीरेंद्र सेहवागने इंस्टाग्रामवर आपल्या परिवारासोबत २०२४ मधील दिवाळीतील फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये सेहवाग आणि त्याची मुलं होती. मात्र, त्याची पत्नी आरती दिसली नाही. त्यामुळे दोघांमध्ये काही तरी बिनसलंय किंवा त्यांच्या नात्यात आता दुरावा आला असल्याच्या सोशल मीडियावर चर्चा रंगू लागल्या आहेत.

वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी हे दोघे बालपणीचे मित्र आहेत. त्यांनी २२ एप्रिल २००४ रोजी लग्न केलं. त्यानंतर त्यांना दोन अपत्यही झाली आहेत. २००७ मध्ये आर्यवीर आणि २०१० मध्ये वेदांतचा जन्म झाला आहे. सेहवाग ७ वर्षाचा आणि आरती ५ वर्षाची असताना त्यांच्या दोघांमध्ये मैत्री झाली होती. १७ वर्षाच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर होताना १४ वर्षाचा काळ लोटला. सेहवाग यांनी २००२ मध्ये आरतीला मस्करीत प्रपोज केलं होतं. मात्र, आरतीने ते खरंखुरं प्रपोज समजून होय असं उत्तर दिलं. दोघांनी ५ वर्षे डेटिंग केलं. आणि २००४ मध्ये लग्न केलं.

कोण आहे आरती अहलावत?

सेहवागच्या पत्नीचे नाव आरती अहलावत आहे. १६ डिसेंबर १९८० रोजी आरतीचा जन्म झाला. लेडी आर्यविन सेकेंडरी स्कूल आणि भारतीय विद्या भवनमध्ये तिने शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर दिल्ली विश्वविद्यालयाच्या मैत्रेयी कॉलेजमधून कम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा केला. साल २००० च्या दरम्यान सेहवागसोबत डेटिंग सुरू झालं आणि २००४ मध्ये लग्न बंधनात अडकली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com