विशाल पाटील यांच्या बंडखोरीचा फटका चंद्रहार पाटील यांना बसण्याची शक्यता

विशाल पाटील यांच्या बंडखोरीचा फटका चंद्रहार पाटील यांना बसण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच सांगलीत काँग्रेस पक्षाकडून विशाल पाटील यांच्यावर कारवाई न केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचे टेन्शन वाढल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे आता चंद्रहार पाटील यांचा पराभव झाल्यास महाविकास आघाडीत बिघाडीची ठिणगी पडू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस पक्षाने विशाल पाटील यांच्यावर अजून कारवाई का केली नाही असा प्रश्न अजूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांना असा सवाल पडला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com