Vishal Patil : कुठली कारवाई करायची असेल तर त्या कारवाईवर सही करणाऱ्याने विचार करावा

Vishal Patil : कुठली कारवाई करायची असेल तर त्या कारवाईवर सही करणाऱ्याने विचार करावा

लोकसभा निवडणुकासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विशाल पाटील यांना काँग्रेसकडून अल्टिमेटम देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सांगलीच्या बैठकीत काँग्रेसने हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर आता विशाल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विशाल पाटील म्हणाले की, काँग्रेसवर अन्याय झालेला आहे. म्हणून कार्यकर्ते एवढे चिडून उठलेले आहेत. कालच्या कार्यक्रमात नेमकं काय झालं मला माहित नाही. पण मी कार्यकर्त्यांना परत सांगतो संयम ठेवा. राग आपला आपल्या पक्षाविरुद्ध व्यक्त केला नाही पाहिजे. आपलं प्रेम अजूनही काँग्रेसवर आहे. ते प्रेम कायम राहणार. मी या मताचा आहे की, कुठलाही पक्षाचा विचाराचा विरोधात वागणूक केलेली नाही. कुठलाही पक्षाचा नियम तोडलेला नाही. कुठलाही आदेश मला लेखी आला नव्हता. आमच्या घराणे 90 वर्ष काँग्रेससाठी काम केलेलं आहे. काँग्रेस पक्षासी एकनिष्ठ राहिलेलो आहे. काँग्रेस पक्ष वाढीसाठी आमच्या पक्षाने काम केलेलं आहे. अडचणीच्या काळात सांगली जिल्ह्यात असूदे किंवा राज्यात असो आजही वसंतदादांच्या काळातच जी सर्वात जास्त आमदार काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त निवडून आलं. शेवटची एक हाती सत्ता काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रात 1985ला आली होती त्यावेळी 161 आमदार निवडून आले होते ते वसंतदादा यांच्या नेतृत्वाखाली. आजतागायत एकदाही145 आकडा काँग्रेसला गाठता आलेला नाही. त्यामुळे आपला पक्ष मागे जात गेला.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, आज जर अशी कुठली कारवाई करायची असेल तर त्या कारवाईवर सही करणाऱ्याने विचार करावा. मला वाटत नाही काँग्रेसमध्ये कुणीही या प्रकारचा निर्णय घेईल. मी काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे. काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी मी ही निवडणूक लढतो आहे. डॉ. विश्वजीत कदम यांनी पहिल्यापासून ताकदीने ही निवडणूक मागितली. कोल्हापूरला काय झालं अदलाबदल हा विषय वेगळा ठेवा. सांगलीमध्ये पूर्ण जय्यत तयारी झाली होती. काही लोकांना हे आवडलेलं नाही. मला अन्यायाची सवय आहे. हा अन्याय काँग्रेस पक्षावर अन्याय झाला. पक्षासाठी विश्वजीत कदम यांनी खूप केलं. त्यांची इच्छा होती काँग्रेसची उमेदवारी या ठिकाणी ते म्हणतील त्याला मिळावी ती पाळली गेली नाही. निवडणूक झाल्यावर आम्ही त्या ठिकाणी निवडून आल्यावर आम्ही विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करणार. असे विशाल पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com