ताज्या बातम्या
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी चांद्रयान 3 च्या यशाबद्दल भारत आणि इस्रोचे केले अभिनंदन
भारताची चांद्रयान मोहिम यशस्वी झाली आहे.
भारताची चांद्रयान मोहिम यशस्वी झाली आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले आहे. 06 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयानने दक्षिण ध्रुवाला स्पर्श केला आहे. यासोबतच भारताने इतिहास रचलेला आहे. यानिमित्त अवघ्या देशाकडून इसरोवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग केल्याबद्दल भारत आणि इस्रोचे अभिनंदन केले आहे. दक्षिण ध्रुवाजवळील चंद्रावर भारताच्या चांद्रयान-3 अंतराळ संशोधनाच्या यशस्वी लँडिंगबद्दल माझे मनःपूर्वक अभिनंदन स्वीकारा. बाह्य अवकाशाच्या संशोधनातील ही एक मोठी प्रगती आहे आणि अर्थातच, भारताने केलेल्या प्रभावी प्रगतीचा पुरावा आहे. असे पुतिन म्हणाले.