ताज्या बातम्या
Vohra Committee Report: वोहरा समितीचा अहवाल रेकॉर्डवरुन गायब; दाऊद आणि राजकारण्यांच्या कनेक्शनचा तपास !
वोहरा समितीचा अहवाल गायब; दाऊद आणि राजकारण्यांच्या कनेक्शनचा तपास थांबला. माहिती अधिकार अर्जाला केंद्रीय गृहखात्याचं धक्कादायक उत्तर.
वोहरा समितीचा अहवाल रेकॉर्डवरून गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दाऊद, अंडरवर्ल्ड आणि राजकारण्यांच्या कनेक्शनबद्दल तपास करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली होती. भारतीय राजकारणी, नेते किंवा शरद पवार यांच्या उल्लेखाविषयी कोणतीही माहिती रेकॉर्डवर नसल्याचं केंद्रीय गृहखात्याने म्हटलं गेलं आहे.
एका माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना केंद्रीय गृहखात्याने अशी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचं म्हटलं आहे. माहितीच अभिलेखावर उपलब्ध नाही, असं गृहखात्याचं उत्तर भुवया उंचावणार आहे.