Election Commission : शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी मतदार नोंदणी सुरु

Election Commission : शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी मतदार नोंदणी सुरु

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर व औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघ, तसेच पुणे व अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी मतदार नोंदणी सुरु

  • भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार

  • पुणे, नागपूर व औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघ

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर व औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघ, तसेच पुणे व अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, पात्र पदवीधर आणि शिक्षकांकडून 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत अनुक्रमे प्रपत्र 18 व 19 मध्ये प्राप्त झालेल्या अर्जांवर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी पात्रता-अपात्रतेचा निर्णय घेतील. प्रारूप मतदार याद्या त्यानुसार 25 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येतील.

यानंतर 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025 या कालावधीत नागरिकांना या यादीविषयी दावे व हरकती सादर करण्याची संधी मिळेल. तसेच, पदवीधर आणि शिक्षकांना 6 नोव्हेंबरनंतरही प्रपत्र 18 व 19 द्वारे मतदार नोंदणी करण्याची मुभा असेल. 30 डिसेंबर 2025 रोजी10 डिसेंबर 2025 पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांवर विचार करून अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. ऑनलाईन नोंदणीची सुविधा शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी (Graduates Constituencies) देखील उपलब्ध आहे.

https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. आवश्यक पात्रतामतदार नोंदणीसाठी निकष, आवश्यक कागदपत्रे व संबंधित माहिती “Manual” या विभागातया संकेतस्थळावरील पाहता येईल. आपली नोंदणी त्यामुळे अद्याप अर्ज सादर न केलेल्या पात्र पदवीधर व शिक्षकांनी तात्काळ करून घ्यावी, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com