उद्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान

उद्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान

राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक उद्या पार पडणार आहे. या निवडणुकीत एनडीएकडून जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) आणि यूपीएकडून मार्गारेट अल्वा (margaret alva) या उभ्या आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक उद्या पार पडणार आहे. या निवडणुकीत एनडीएकडून जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) आणि यूपीएकडून मार्गारेट अल्वा (margaret alva) या उभ्या आहेत. नखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. तर अल्वा या गुजरातच्या राज्यपाल होत्या. दोघेही माजी मंत्री आहेत. त्यामुळे उपराष्ट्रपती आता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत पक्षाचा व्हीप नसणार आहे. भीती न बाळगता तुम्ही मतदान करा. उपराष्ट्रपती हा देशासाठी काम करणारा, निष्पक्ष असावा यासाठी मला मतदान करा, असं आवाहन मार्गारेट अल्वा यांनी केलं आहे.या निवडणुकीसाठी राज्यसभा आणि लोकसभा सदस्य मतदान करणार आहेत. यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांनी मलाच मतदान करण्याचं आवाहन खासदारांना केलं आहे. उद्याच उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. म्हणजे देशाला उद्याच नवा उपराष्ट्रपती मिळणार आहे.

 उद्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान
आरबीआय आज पतधोरण जाहीर करणार; कर्ज पुन्हा महागणार?
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com