ताज्या बातम्या
वाल्मिक कराडला घेऊन आलेली गाडी धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याची?
वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीसमोर शरण आला.
बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.
या पार्श्वभूमीवर आता वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीसमोर शरण आला. वाल्मिक कराड सरेंडर होण्यासाठी ज्या गाडीतून आला. त्या गाडीची आता चर्चा रंगली आहे. वाल्मिक कराड ज्या गाडीतून आला ती गाडी नेमकी कुणाची असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात दाखल झाले ती गाडी शिवलिंग मोराळे यांची असल्याची माहिती मिळत आहे. वाल्मिक कराडला घेऊन आलेली गाडी धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याची असल्याची आता माहिती मिळत आहे.