Walmik Karad: कराडच्या जामीन अर्जाची सुनावणी लांबणीवर, देशमुख कुटुंब नाराज

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली, देशमुख कुटुंब नाराज.
Published by :
Prachi Nate

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अखेर 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे संशयित म्हणून वाल्मीक कराड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. या सोबतच वाल्मीक कराड यांच्यावर खंडणीचे गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे.

यावर आज न्यायालयात सुनावणी होती, वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. तर ही सुनावणी आता पुन्हा 23 जानेवारी पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यावर बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच पोलिसांनी तपासात ढील दिल्याने पुढची तारीख मिळाल्याच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी ते अकोल्यात आयोजित जन आक्रोश मोर्चा दरम्यान बोलत होते. तर जनतेच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद काढलं पाहिजे अशी मागणी ही धनंजय देशमुख यांनी यावेळी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com