ताज्या बातम्या
Beed : वाल्मिकच्या बातम्या का पाहतो?, कृष्णा आंधळेच्या मित्रांकडून तरुणाला बेदम मारहाण
वाल्मिकच्या बातम्या मोबाईलवर का पाहतोस? असं विचारत तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बीडमध्ये घडली आहे.
वाल्मिकच्या बातम्या मोबाईलवर का पाहतोस? असं विचारत तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. अशोक मोहिते असं मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अशोक शंकर मोहिते हा त्याच्या मोबाईलवर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित बातम्या पाहत होता. यादरम्यान वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप यांनी पाहिले. यावेळी तरुणाला मोबाईलवर सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील बातम्या का पाहतो? याचा जाब विचारून वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी बेदम मारहाण केली.
याप्रकरणी जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून धारूर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.